उर्फी जावेद कपड्यांवरून नेहमीच चर्चेत असते. तिच्या पेहरावामुळे बऱ्याचदा तिच्यावर टीका केली जाते. अनेक सार्वजनिक ठिकाणीही ती अत्यंत कमी कपड्यात दिसते. त्यामुळे ती पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी कमी कपडे घालते असंही म्हंटलं जातं.

याच कारणावरून सध्या भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळत आहे. पण अशातच आता उर्फीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत ती नेहमीच कमी कपडे का घालते याचं कारण सांगितलं आहे.

आणखी वाचा : सॉफ्टपॉर्नवर आक्षेप नाही मग ऊर्फीवर का?

उर्फी जावेदच्या कपड्यांमुळे तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. चित्रा वाघ करत असलेल्या टीकांवर उर्फीही प्रत्युत्तर करताना दिसतेय. पण आता उर्फीने एक व्हिडीओ पोस्ट करून कमी कपडे घालण्यामागचं कारण उघड केलं आहे. कमी कपडे घालणं हा तिचा नाईलाज आहे असं तिने नुकतंच सांगितलं.

हेही वाचा : “माझा नंगानाच सुरुच राहणार” म्हणणाऱ्या उर्फी जावेदला चित्रा वाघ यांचा इशारा; म्हणाल्या, “तिला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीने शेअर केलेल्या व्हिडीओ तिच्या हातावर आणि पायावर पुरळ उठलेलं दिसत आहे. अंगावर उठलेली ही अ‍ॅलर्जी दाखवताना उर्फी म्हणाली, “मला बऱ्याचदा विचारलं जातं की तू कमी कपडे का घालतेस पण याचं कारण म्हणजे कपड्यांमुळे मला येणारी अ‍ॅलर्जी हे आहे. अंगभर कपडे किंवा लोकरीचे कपडे घातले तर मला एलर्जी येते आणि म्हणूनच मी नेहमी कमी कपड्यांमध्ये तुम्हाला दिसते. ती येणारी ऍलर्जी टाळण्यासाठी मी कमी कपडे घालते. मला कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे.” आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.