सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असल्यामुळे अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत चर्तेत येत असते. मात्र सध्या उर्वशीविषयी खास चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे तिच्याविषयीही ही चर्चा बोल्ड फोटोमुळे होत नसून तिने केलेल्या मदतीमुळे होत आहे. उर्वशीने करोनाग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात सारं काही बंद असून अनेकांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे काहींना करोनाची लागण झाली आहे त्यामुळे सध्या देश मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जात आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात उर्वशीनेदेखील ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, उर्वशीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिने वर्च्युअल डान्स मास्टरक्लासचं आयोजन केल्याची माहिती दिली होती. ज्यांना डान्स शिकण्याची किंवा वजन कमी करण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांसाठी तिने मोफत सेशन ठेवलं होतं. या उपक्रमाअंतर्गत तिन झुम्बा, तबता आणि लॅटिन डान्स हे तीन डान्स प्रकार शिकवले, या डान्स मास्टरक्लासमध्ये ती जवळपास १ कोटी ८० लाख लोकांपर्यंत पोहचू शकली. तसंच तिला ५ कोटीही देण्यात आले. विशेष म्हणजे तिला मिळालेली रक्कम तिने गरजुंसाठी दिली आहे.


”जे सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत झटत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते. केवळ राजकीय व्यक्ती, संगीतकार, स्टार्स किंवा त्यांच्याप्रमाणेच अन्य दिग्गजांचेच नाही, तर सामान्य जनतेचेही मी आभार मानते. कारण या काळात प्रत्येक जण एकमेकाची साथ देत आहे. त्यामुळे या एकीची गरज आहे आणि कोणतीही मदत लहान किंवा मोठी नसते. त्यामुळे सगळे एकत्र असणं गरजेचं आहे”, असं उर्वशी म्हणाली.

दरम्यान, अनेकदा बोल्ड फोटोमुळे चर्चेत येणाऱ्या उर्वशीने मदतीचा हात पुढे केल्यामुळे यावेळी तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गरजुंसाठी आणि करोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urvashi rautela donates rs 5 crore for covid19 relief fund ssj
First published on: 12-05-2020 at 10:46 IST