अभिनेत्री उर्वशी रौतेला ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये नेहमीच घाम गाळत असते. तिचे अनेक वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे हे व्हिडीओ पाहून चाहते सुद्धा स्वतःच्या फिटनेससाठी प्रेरित होतात. अशात अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा आणखी नवा वर्कआउट व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये ती जिममध्ये अतिशय टफ वर्कआउट करताना दिसून येतेय. या व्हिडीओमधला उर्वशीचा हा टफ वर्कआउट पाहून लोक हैराण झाले आहेत. तसंच फिटनेसाठीचं ती घेत असलेली मेहनत पाहून तिचं कौतुक देखील केलं जातंय.
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा हा नवा वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री उर्वशीने जिम आउटफिट्स परिधान केले असून व्यायाम करताना दिसून येतेय. अभिनेत्री उर्वशीचे तिच्या इन्स्टाग्रामवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर एकूण ४० मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर केला असला तरी सोबत कॅप्शन मात्र लिहिण्यात तिचा गोंधळ उडाला. “40 मिलियन लव्ह…माझ्या या वर्कआउट कॅप्शन द्या प्लीज.” असं लिहित तिने हा नवा वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केलाय.
आणखी वाचा: शेहनाजसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार होता सिद्धार्थ शुक्ला; साखरपुडाही झाला होता
View this post on Instagram