अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बऱ्याचदा ती तिच्या पोस्टमुळे ट्रोल होत असते. आता तिने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकरी तिच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. तिचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे. अभिनेत्री असूनही तिला मुख्यमंत्री कोण हे माहीत नसल्याने नेटकरी तिची खिल्ली उडवत आहेत.

“करीनाने चाहत्यांना उत्तरही दिलं नाही”, नारायण मूर्तींनी अभिनेत्रीबद्दल केलेल्या वक्तव्याला सुझान खानचं समर्थन, म्हणाली…

उर्वशीने अभिनेता पवन कल्याण यांचा आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला. आज २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार्‍या ‘ब्रो’ चित्रपटामध्ये हे दोघे स्क्रीन शेअर करत आहेत. उर्वशीच्या चुकीमुळे इंटरनेटवर नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आहेत.

“ट्वीट करताना थोडं भान ठेव, दारू पिऊन ट्वीट करू नकोस,” असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

“प्रिय उर्वशी रौतेला, मला ट्विटरवर आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनवल्याबद्दल धन्यवाद,” असं पवन कल्याण यांच्या नावाच्या बनावट अकाउंटवरून युजरने म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पवन कल्याण आणि साई धरम तेज स्टारर ‘ब्रो’ या चित्रपटातील एका गाण्यात उर्वशी रौतेला देखील दिसणार आहे. चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये उर्वशीने दोन्ही स्टार्ससोबत पोज दिली आणि त्यांच्यासोबतचे फोटो ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले. मात्र, त्यात तिने पवन कल्याण यांचा आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री असा उल्लेख केला.