करीना कपूरने दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने सोशल मीडियावर करीना आणि सैफ अली खानला ट्रोल केलं जातंय. यातच करीनाला पाठिंबा देत अभिनेत्री स्वरा भास्करने नेटकऱ्यांना चांगलतं फटकारलं होतं. स्वरा भास्करने एक ट्वीट करत नेटकऱ्यांवर संताप व्यक्त केला होता. स्वराच्या या ट्वीटवर आता नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
करीना कपूरने मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानंतर स्वराने “इतरांच्या आयुष्यात डोकावू नका” अशा आशयाचं एक ट्वीट केलं होतं. यावर एका नेटकऱ्याने स्वराला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. नेटकरी म्हणाला, ” स्वरा भास्कर तिच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार आहे.” यावर स्वराने देखील नेटकऱ्यांला उत्तर दिलंय. स्वरा म्हणाली, “मला सुलेमान जास्त आवडतं”
I like Suleiman better! 🙂 https://t.co/vxFwnZ1rTn
— Swara Bhasker (@ReallySwara) August 11, 2021
स्वराच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर स्वराच्या नसलेल्या बाळाच्या नावावरून चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेत स्वरानेदेखील भाग घेतला. एक युजर म्हणाली, “मी अकबर या नावासाठी मत देईन” यावर स्वराने ” चला स्वराच्या नसलेल्या बाळाच्या नावासाठी पोल घेऊ” अशी धमाल प्रतिक्रिया दिली आहे.
Let’s have a poll! #NameSwarasNonExistentBaby https://t.co/kcMLYhACFE
— Swara Bhasker (@ReallySwara) August 11, 2021
करीना कपूरला ट्रोल करणऱ्यांना काय म्हणाली होती स्वरा भास्कर
स्वरा भास्करने एक ट्वीट करत ट्रोलर्सवर संताप व्यक्त केला. या पोस्टमध्ये तिने लिहलंय, “जर एखाद्या दाम्पत्याने आपल्या मुलांची नावं ठेवली आहेत आणि ते दाम्पत्य तुम्ही नाही. मात्र तुम्हाला हे नाव काय आहे? आणि कशाला असे विचार येत असतील, यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जात असतील,,,तर तुम्ही मोठे गाढव आहात.” असं म्हणत स्वराने नेटकऱ्यांना सुनावलं.