हा अभिनेता दारू पिऊन पोहचला सेटवर

याच सेटवर तो दारु पिऊन आल्याचे निदर्शनास आले आहे

सध्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये वरुण धवन आणि आलिया भट्ट व्यस्त आहेत. याच सेटवर वरुण दारु पिऊन आल्याचे निदर्शनास आले आहे. खरंतर त्याने दारु कोणत्याही वेगळ्या कारणाने नाही तर शॉट खरा वाटावा यासाठी प्यायला होता. त्याला या सिनेमातल्या एका भावूक सीनमध्ये दारु पिऊन आल्याचे दाखवण्यात आले आहे. हा शॉट वास्तववादी वाटण्यासाठी वरुणला व्हिस्कीचे काही नीट शॉट मारणे योग्य वाटले. मजेशीर गोष्ट म्हणजे त्याची ही करामत त्याला कामीही आली. इंग्रजी संकेतस्थळ फिल्मीमंकीच्या मते, दिग्दर्शक शशांक खेतान याला वरुणने दारु प्यायल्यानंतर जो शॉट दिला तो अधिक पसंत पडला. त्यांनी सांगितले की वरुणला विश्वास होता की हा शॉट दारु प्यायल्यानंतरच चांगल्या प्रकारे देता येऊ शकतो.

वरुण मद्यपान करत नाही. काही खास कारण असेल तरच तो दारुला हात लावतो अन्यथा यापासून लांब राहणंच पसंत करतो. या संकेतस्थळानुसार जेव्हा वरुणला याबद्दल विचारले असता त्यानेही एका शॉटसाठी मद्यपान केल्याची कबूली दिली. नीट व्हिस्की घेतल्यामुळे काही वेळासाठी मी थोडा सैरभैर झालो होतो पण थोड्यावेळाने मी ठीक झालो. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या सिनेमात असाच एक शॉट देताना वरुणने मद्यपान केले होते. या सिनेमात वरुणसोबत आलिया भट्टही दिसणार आहे.

Badrinath-ki-dulhaniya

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Varun dhawan got drunk on sets of badrinath ki dulhaniya