गेल्या वर्ष भरापासून करोनाचे संकट आपल्यावरून गेले नाही. त्यात अनेक लोक हे त्यांच्या जवळच्या लोकांच्या मृत्यूसाठी डॉक्टरांना जबाबदार ठरवलं. एवढंच नाही तर अनेकांनी तर डॉक्टरांची मारहाण केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काही लोकांनी मिळूण एका डॉक्टराला मारहाण केली आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मृत्यूसाठी डॉक्टर जबाबदार असल्याचे सांगितले. आता बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरुणने नुकतेच डॉक्टर मनन वोरासोबत एक इन्स्टाग्राम लाइव्ह केले. यावेळी वरुणने डॉक्टरांवर होणाऱ्या या हिंसाचारावर वक्तव्य केलं आहे. “रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे जबाबदार हे डॉक्टर नाही. करोनासारख्या भयानक परिस्थितीत जेव्हा संपूर्ण जग हे लढत आहे, अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासारखे आहेत, डॉक्टरांना त्रास देऊ नका, तुम्ही असं करू शकतं नाही. आणि त्यांच्यावर हिंसाचारा करू नको हे अशा पद्धतीने आम्ही बोलूण लोकांना त्यांची चुक दाखवूण द्यावी लागेल हे योग्य नाही,” असं वरुण म्हणाला.

“करोना काळात रुग्णांवर उपचार करत असाताना डॉक्टरांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो, या विषयी डॉक्टर मनन वोरा यांच्याशी चर्चा केली,” असे कॅप्शन देत वरुणने त्याचा व्हिडीओ देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

या लाइव्ह सेशनमध्ये लवकरच चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याचे वरुणने सांगितले. या आधी वरुण ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटात वरुणसोबत मुख्य भूमिकेत क्रिती सेनन आणि अभिषेक बॅनर्जी दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  अमर कौशिक करत आहेत. हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे. यानंतर वरुण ‘जुग जुग जियो’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan reacts to violence faced by doctors says don t harass docs you can t do that dcp
First published on: 06-06-2021 at 14:45 IST