रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला आणि आतापर्यंत या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं ‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला असून आता याची ५० कोटीकडे घोडदौड सुरू आहे.

या चित्रपटात रितेश आणि जिनिलीया यांच्याबरोबरच अभिनेत्री जिया शंकर हीचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. तिची भूमिकासुद्धा प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना नुकतंच जियाने रितेश आणि जिनिलीया या जोडप्याबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टींचा खुलासा केला. एक जोडपं म्हणून ते कसे आहेत, शिवाय कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यातील प्रेम अजूनही तसंच चिरतरुण ठेवलं आहे, याबद्दल जियाने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट उभे ठाकणार आमने सामने; दोघांचे चित्रपट होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

याबद्दल जिया म्हणाली, “ते दोघे पडद्यावर किंवा सोशल मीडियावर जसे दिसतात खऱ्या आयुष्यातसुद्धा ते अगदी तसेच आहेत. दोन दशकं उलटली तरी त्यांच्यातील प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही. त्यांच्याकडे पाहून आजच्या पिढीने काहीतरी शिकायला हवं. एक पुरुष त्याच्या साथीदाराला कशी वागणूक देतो हे रितेशकडून शिकण्यासारखं. रितेश सर कोणत्याही महिलेला सेटवर ज्याप्रकारची वागणूक देतात तशी कुठेच मिळत नाही. त्याच्या सेटवर सगळेच प्रचंड खुष असतात.”

View this post on Instagram

A post shared by Jiya Shankar (@jiyaashankarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच जियाने चित्रपटसृष्टीतील काम करण्याच्या अनुभवाबद्दलसुद्धा सांगितलं. ती म्हणाली, “मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण मी असे बरेच स्वार्थी नट पाहिले आहेत जे कायम स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात. त्यांना फक्त त्यांच्या कामाची पर्वा असते. समोरची व्यक्ती काय करतीये याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. एखादा सीन करताना माझी जागा घ्यायचा कुणी प्रयत्न केला तर मी तसं होऊ देत नाही.” जियाने ‘वेड’मधून मराठी चित्रपटसृष्टित पदार्पण केलं. याबरोबरच तिने काही दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.