अभिनेता विक्की कौशलने आतापर्यंत त्याच्या अनेक चित्रपटात एका पेक्षा एक सुपरहिट भूमिका साकारल्या आहेत. विक्कीने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो फॅन्सच्या मनात जागा निर्माण केलीय. विक्की आपल्या सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटांबाबत अपडेट देत असतो. अशातच विक्कीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
अभिनता विक्की कौशलने नुकतंच त्याने आपल्या स्टाइलमधला एक व्हिडीओ शेअर केलाय. विक्कीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही मिनिटांत सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. फक्त त्याचे फॅन्सच नव्हे तर दीपिका पादुकोणसह बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनी सुद्धा यावर कमेंट्स करत विक्कीचं कौतुक केलंय..
विक्की कौशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा शानदार व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये विक्की एका इंग्रजी गाण्यावर आपला स्वॅग दाखवताना दिसून येतोय. सुरवातीला तो आपले केस सरळ करताना दिसून येतो. त्यानंतर तो त्याची एक हुडी कॅप घालून आपली स्टाइल दाखवताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना विक्कीने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “खूप गोड दिसतोय…काही वेळाने १०० टक्के डिलीट करणार आहे…खूप जोरात अभिनय येत होता…वॅनिटी जॅम- पर्पल हॅट….”
View this post on Instagram
विक्कीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. फक्त फॅन्सच नव्हे तर सेलिब्रिटी सुद्धा त्याच्या या व्हिडीओचा आनंद घेत आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने सुद्धा त्याच्या या व्हिडीओवर फनी स्माइलीची कमेंट केलीय. तर अभिनेता ह्रतिक रोशनने सुद्धा यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलंय. विक्कीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्येच १ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.