scorecardresearch

‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! विद्या बालनच्या जागी ‘या’ अभिनेत्रींच्या नावांची चर्चा

विद्या बालनची मुख्य भूमिका असलेला ‘डर्टी पिक्चर’ तुफान गाजला होता.

‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! विद्या बालनच्या जागी ‘या’ अभिनेत्रींच्या नावांची चर्चा
विद्या बालन, नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी यांचा २०११ साली प्रदर्शित झालेला 'द डर्टी पिक्चर' हा चित्रपट तुफान गाजला होता.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचं नाव अशा अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं ज्यांनी क्लासिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विद्या बालनचा कोणताही चित्रपट अलिकडच्या काळात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला नाही. तिचा ‘जलसा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नसली तरी विद्या बालनच्या कामाचं मात्र कौतुक झालं. मात्र विद्या बालन, नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी यांचा २०११ साली प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट तुफान गाजला होता. प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता जवळपास एक दशकानंतर ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘द डर्टी पिक्चर’च्या सिक्वेलवर काम सुरू झाले आहे, मात्र अद्याप या चित्रपटासाठी विद्या बालनला विचारणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी हा चित्रपट सिल्क स्मिताच्या तरुणाईच्या दिवसांवर आधारित असल्याचं बोललं जात आहे. द डर्टी पिक्चरच्या सिक्वेलच्या स्क्रिप्टवर काम सुरू झाल्याचीही चर्चा आहे.
आणखी वाचा- KBC 14 : अमिताभ बच्चन यांच्यासमोर ‘तो’ थेट गर्लफ्रेंडलाच घेऊन आला अन्…

‘द डर्टी पिक्चर’ची कथा प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित होती. एक खेड्यातील मुलगी हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहते. त्यासाठी ती घर सोडून चेन्नईला पळून जाते आणि नंतर फिल्मी दुनियेत रेशम बनून चित्रपटसृष्टीवर राज्य करते हे या चित्रपटून दाखवण्यात आलं आहे. मात्र, या चित्रपटाच्या सिक्वेलची कथा वेगळी असणार असल्याचं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात विद्या बालनच्या जागी क्रिती सेनॉन किंवा तापसी पन्नूलाही विचारण्यात येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- “…म्हणून बॉलिवूडमधील निर्माते स्त्रीप्रधान चित्रपट बनवत नाहीत”; विद्या बालनचे वक्तव्य चर्चेत

दरम्यान एकता कपूर बऱ्याच काळापासून या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करण्याच्या विचारात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि एकता कपूर या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचीही चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या