अभिनेत्री विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अॅमेझॉन प्राइमने ‘मैं शेरनी’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्यात विद्या शिवाय अनेक महिला दिसत आहेत. हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून याची चर्चा ही सोशल मीडियावर प्रचंड होतं आहे. हे खास गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायले आहे. राघव यांनी लिहिलेले ‘मैं शेरनी’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे.

अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, “कधीही हार न मानण्याची जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे ‘मैं शेरनी’ हा म्युझिक व्हिडीओ. ‘शेरनी’ आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट… यातून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : Indian Idol 12: ‘प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा’, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया झाले ट्रोल

या गाण्याची गायिका अकासा म्हणाली, “स्त्री आणि तिच्यातील ताकदीला सलाम करणाऱ्या या गाण्याचा भाग असणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. या गाण्यातून जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या वाघिणीला जागृत करता येईल, कधीही हार न मानता स्वप्नांचा वेध घेण्याची आणि सतत मेहनत करण्याची प्रेरणा त्यांना देता येईल, अशी आम्हाला आशा आहे. मी नेहमीच स्त्रीशक्तीला पाठिंबा दिला आहे आणि शेरनीचा भाग असणं, हे कायमच माझ्या लक्षात राहील, असं गाणं गाणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. या दमदार गाण्यासाठी रफ्तारसोबत काम करताना छान वाटलं. हे बोल, त्यातील संगीत माझ्याशी संवाद साधतात आणि हा चित्रपटातून काय दाखवायचा प्रयत्न केला आहे हे प्रेक्षकांना या गाण्यातून अनुभवता येईल, अशी मला खात्री आहे.”

तर रॅपर रफ्तार म्हणाला, “शेरनी हा माझ्यासाठी फार छान प्रोजेक्ट होता. या एका शब्दात प्रचंड ताकद आहे आणि या शब्दाचं महत्त्व गाण्यातून दाखवून देणं हे एक मोठं आव्हान होतं. अकासा आणि मी ते करू शकलो आहोत, अशी आशा आहे. मी आणि अकासाने अगदी जीव ओतून यासाठी काम केलंय आणि आमची ही जिद्द यात उतरली याचा मला खरंच आनंद आहे.”

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

भारत आणि २४० हून अधिक देशांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. अॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांना १८ जून रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.