‘कॉफी विथ करण सिझन ७’ या शोमध्ये बॉलिवूडसोबतच यंदा साऊथ सेलिब्रिटींनी खास हजेरी लावत धमाल केली आहे. या शोमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने अक्षय कुमार सोबत हजेरी लावली होती. त्यानंतर आता अभिनेता विजय देवरकोंडादेखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत तो या शोमध्ये धमाल करताना दिसेल. सध्या या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

करण जोहरचे बेधडक प्रश्न आणि या प्रश्नांना अनन्या आणि विजयने दिलेली हटके उत्तर अशी मनोरंजनाची खमंग मेजवानी या एपिसोडमध्ये अनुवभवता येणार आहे. प्रोमोमध्ये करण जोहर ‘लायगर’ फेम अभिनेता विजय देवरकोंडाला त्याच्या आवडी-निवडींसह त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतोय. एवढचं काय तर करणने त्याला सेक्सबद्दलही काही थेट प्रश्न विचारले आहेत.

करण जोहरने विजयला एक असा प्रश्न विचारला आहे ज्याचं विजयने दिलेलं उत्तर ऐकून कदाचित तुम्हाला थक्का बसेल. करणने विजयला ‘त्याने कधी थ्रीसम केलंय का ?’ म्हणजेच तो कधी तीन जणांसोबत एकत्र सेक्शुअल अॅक्टिव्हिटीमध्ये सामिल झालाय का, असा प्रश्न विचारला. यावर विजयने ‘नाही’ असं उत्तर दिलं. मात्र यावर करणने लगेचच त्याला आणखी एक प्रश्न विचारला. “जर संधी मिळाली तर तुला थ्रीसम करायला आवडेल का?” यावर विजयने जे उत्तर दिलं त्याने कदाचित काहींच्या भुवया उंचावू शकतात. “थ्रीसम करण्यास माझी काही हरकत नाही.” असं विजय म्हणाला.

हे देखील वाचा: “महिलांनी शरीर दाखवलं तर…” रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर राम गोपाल वर्माची कमेंट चर्चेत

हे देखील वाचा: ‘डार्लिंग्स’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आलियाची हजेरी, बेबी बंप लपविण्यासाठी निवडला ‘हा’ खास लूक

या खास एपिसोडच्या प्रोमोमध्ये करण जोहर अनन्या पांडेला तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसतोय. या प्रश्नावर आता अनन्याने काय उत्तर दिलंय हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड पहावा लागेल. तसंच या एपिसोडमधून खासगी आयुष्याबद्दल अनन्या आणि विजय देवराकोंडाने काय खुलासे केले आहेत हे देखील उलगडणार आहे.