बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर वीर दास हा त्याच्या खास विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. वीरचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मात्र, यावेळी वीर दासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले आहे.

वीर दासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने २००२ साली केलेल्या संघर्षाविषयी सांगितले आहे. त्याच्याकडे घराचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हेत, क्रेडीट कार्डचे एजंट त्याला रोज फोन करत असत आणि धमकी देत. एकाच वेळी तिन नोकऱ्या कराव्या लागल्या होत्या. एक इंटर्नशीप होती असे म्हणत वीर दासने त्याच्या आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले आहे.
आणखी वाचा : जगासमोर येणार कंगनाचा जोडीदार; अभिनेत्रीनेच दिले संकेत, म्हणाली, “तुम्हाला लवकरच…”

‘मेड पाहिल्यावर मला एनझायटीसारखे वाटू लागले. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणजे २००२मध्ये मी शिकागो मध्ये होतो तेव्हाचा. माझ्याकडे कोणताही इन्शूरन्स नव्हता, मी नेहमी भाडे उशिरा द्यायचो, क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी एजंट सतत फोन करायचे आणि मला धमकी द्यायचे. अकाऊंटमध्ये केवळ आठ डॉल असल्याचे कळाल्यावर रात्री दोन वाजत एटीएम बाहेर मी रडत होतो. एटीएममधून तुम्हाला कमीत कमी २० डॉलर काढावे लागतात’ असे वीर दास म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘मी एका भयानक फ्लॅटमध्ये राहात होतो. मी फ्लॅटमेटचा शँम्पू वापरायचो आणि त्याला कळायला नको म्हणून मी त्याच्या बॉटलमध्ये पाणी टाकायचो. काही दिवस रात्री थिएटर कंपनीमध्ये काम केले.’