बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. पतौडी कुटुंबाची लाडकी सोहा अनेकदा तिचे आणि कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यावेळी तर सोहाने पती कुणाल खेमूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत कुणाल त्याची मैत्रिणी आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटासोबत रेस्टॉरंटमध्ये बिल भरण्यासाठी भांडत होत आहे. पण कुणालने त्याच्या मैत्रिणीला बिलभरू देत नाही. यावेळी सोहाने त्या दोघांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ शेअर करत सोहा म्हणाली, “प्रत्येकवेळी जेव्हा भारतीय बिल भरतात तेव्हा असं होतं.”

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल

आणखी वाचा : “ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतच्या ‘या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोहाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना चाहते प्रचंड हसत आहेत. तर कोणाला जाणून घ्यायचे होते की हे बिल कोणी दिले? कुणाल खेमूने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून ‘ही एक सत्य कथा आहे’ असे लिहिले आहे. याशिवाय ‘बिल देखे देखो, बिल देखो देखो, बिल देखो देखो जी’ असे कॅप्शन कुणालने दिले आहे. तर हे खरं गाणं मोहम्मद रफीचे प्रसिद्ध गाणे ‘दिल देके देखो को’ आहे.