सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात लोक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नाताळ आणि नववर्ष अशा एकत्र सुट्ट्या घेऊन लोक बाहेर फिरण्यासाठी गेले आहेत. सामान्य जनतेप्रमाणे सेलिब्रेटीदेखील यात मागे नाही. हृतिक रोशनपासून ते विराट कोहलीपर्यंत नववर्षाच्या स्वागतासाठी तयार झाले आहेत. नुकताच त्यांनी एका फोटो शेअर केला आहे.

विराट कोहली टीम इंडियाबरोबर बांगलादेशच्या दौऱ्यावर होता, तेथून तो मुंबईतील त्याच्या घरी परतला होता. त्यानंतर तो पत्नीबरोबर नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईतून रवाना झाला होता. या दोघांचा विमानतळावरील लूक चांगलाच व्हायरल झाला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी ते दोघे दुबई येथे गेले आहेत.

आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती

विराट कोहलीने अभिनेत्री-पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका कोहलीबरोबर दुबईतील एक नवीन फोटो शेअर केला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या हॉटेलमधील एका तलावाजवळ उभे राहिले आणि सूर्योदयाकडे पाहताना त्यांची पाठ कॅमेराकडे होती. अनुष्का त्यांच्या शेजारी उभी असताना विराटने वामिकाला हातात धरले. फॅमिली फोटो शेअर करत विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२२ च्या शेवटच्या सूर्योदयापर्यंत.” त्याने कॅप्शनमध्ये रेड हार्ट इमोजी वापरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. अनुष्का शर्माने २०१७ मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नगाठ बांधली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले जाते. ते दोघेही त्यांच्या व्यस्त करिअरमध्येही एकमेकांसाठी वेळ काढत असतात. विराट आणि अनुष्काच्या लग्नाला ५ वर्षे पूर्ण झाली आहे.