Virat Kohli’s recent post breaks record: काळाप्रमाणे तंत्रज्ञानात अनेक बदल होत गेले आहेत. तंत्रज्ञानामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती कुठेही पोहोचवता येणे शक्य झाले. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्याचे व्यक्त होण्याचे, तसेच आपल्या आवडत्या कलाकारांच्या, खेळाडूच्या संपर्कात राहणे शक्य झाले आहे.

बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक लोकप्रिय खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतात. त्यांनी शेअर केलेले फोटो, व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्याच्यावर त्यांचे चाहते व्यक्त होताना दिसतात. ते कमेंट्स करीत त्यांचे प्रेम व्यक्त करतात. काही वेळा जर त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत, तर ते त्यांना ट्रोलदेखील करताना दिसतात.

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासह शेअर केला फोटो

आता प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीने शनिवारी पत्नी अनुष्का शर्मासह एक फोटो शेअर केला होता. विराट कोहलीच्या या फोटोने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या फोटोला अवघ्या दोन तासांत ५० लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. इतक्या कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळवीत या पोस्टने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

या फोटोमध्ये विराटने चष्मा घातला असून, निळ्या रंगाचा लांब कोट घातला आहे; तर अनुष्काने राखाडी रंगाचा ट्रेंच कोट घातला आहे. दोघेही कॅमेऱ्याकडे बघून हसत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत या फोटोला १० दशलक्षांहून अधिक लोकांनी लाइक केले आहेत. ३०२ हजार कमेंट्स केल्या आहेत आणि २०१ हजार जणांनी हा फोटो रीशेअर केला आहे. विराटने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत या जोडीचे कौतुक केले आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर २७३ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विराटच्या फॉलोअर्सची संख्या ही भारतीय सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक आहे.

विराटची पत्नी अनुष्का प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. ती काही काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असल्याचे पाहायला मिळते. आता ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.