भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, गायक आणि संगीतकार विशाल दादलानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय मुस्लिमांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरुन त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

विशाल हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींवर पोस्ट शेअर करत त्याच मत मांडत असतो. विशालनं सध्याच्या राजकारणाविषयी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. विशाल त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, मी भारतीय मुस्लिमांना एक गोष्ट हिंदू बांधवांच्यावतीनं सांगु इच्छितो की, तुम्हाला पाहिलं जातं, तुमचा आवाज ऐकला जातोय आणि तुमचं कौतूकही केलं जातं. त्यामुळे तुम्हाला ज्या वेदना होतात त्या आम्हालाही होतात. तुमच्या देशभक्तीवरुन कोण काही विचारत असेल तर ते चूकीचे आहे. तुमची ओळख काही भारतासाठी धोकादायक नाही. आपण सर्वजण एका राष्ट्राचे आहोत. ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, असे विशालनं म्हटलं होतं.

आणखी वाचा : “मी त्याच्यावर प्रेम करते”; जॉनी डेप विरोधात मानहानीचा खटला हरल्यानंतर अँबर हर्डने केलेले वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : आलियाच्या पोस्टवर कमेंट करत ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं कौतुक केल्यामुळे अमृता खानविलकर झाली ट्रोल

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशालनं जेव्हा मुस्लिम बांधवांच्या बाजुनं जेव्हा अशाप्रकारचे ट्वीट केले त्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात टीका होतं आहे. एक नेटकरी विशालला ट्रोल करत म्हणाला, “भाऊ सगळ्यात आधी हे सांग की तू या देशाचा पंतप्रधान आहेस का?, जे तू बहुसंख्याकांच्या वतीने बोलत आहेस”, असे बरेच ट्वीट करत नेटकऱ्यांनी विशालला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.