मागच्या महिन्यामध्ये सर्वत्र बॉयकॉट बॉलिवूड हा नवा ट्रेंड सुरु झाला होता. या ट्रेंडचा प्रभाव ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षाबंधन’ सारख्या बिगबजेट चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. याच सुमारास ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार होता. बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट देखील फ्लॉप होणार असे म्हटले जात होते. तरीही सर्व अंदाज खोटे ठरवत या चित्रपटाने चांगली कमाई करुन दाखवली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. यातच चित्रपटाच्या कलेक्शनवरुन नवा वाद सुरु झाला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने दहा दिवसांमध्ये ३६० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर चित्रपटाचा फोटो पोस्ट करत ही बातमी दिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास रचणार असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाबद्दल एक वादग्रस्त ट्वीट पोस्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडचे समर्थन करणारे वक्तव्य केले होते.

आणखी वाचा – “‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा चांगला ट्रेंड…” ; विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा

काही वृत्तवाहिन्यांनी बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ची तुलना केली होती. ३६० कोटी कमावत ब्रह्मास्त्रने काश्मीर फाईल्सला मागे टाकले आहे असा मथळा असलेल्या बातम्यांमुळे विवेक अग्निहोत्री भडकले आहेत. या विषयावर मत मांडण्यासाठी त्यांनी ट्विटरचा आधार घेतला आहे. पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी काही वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट्स जोडले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी “हा..हा..हा.. मला माहीत नाही त्यांनी द काश्मीर फाईल्सला कसे मागे पाडले.. त्यांनी काठ्या, रॉड्स, हॉकी स्टिक किंवा एके४७ किंवा दगड.. किंवा पेड पीआर आणि एन्फ्लुअन्सर्सचा वापर केला असेल का ? तुम्ही तुमचे बॉलिवूडचे चित्रपट घेऊन भांडत रहा. पण मला एकटं सोडा. मला तुमच्यामध्ये स्पर्धेमध्ये सामील करु नका”, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काश्मीर फाईल्सला मिळालेल्या यशानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या नावाने नवा चित्रपट तयार करणार आहेत.