२०२२मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. १९९०मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. पण प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाकडे पाठ न फिरवता ‘द कश्मीर फाइल्स’ला उत्तम प्रतिसाद दिला. इतकंच नव्हे तर अभिनेता अक्षय कुमारने देखील या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ शेअर करत अक्षयचे आभार मानले होते. पण त्यांनीच आता अक्षयवर एक आरोप केला आहे.
आरजे रौनकला मुलाखत देत असताना विवेक अग्निहोत्री यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. बॉलिवूडकडून या चित्रपटासाठी आपल्याला पाठिंबा मिळाला नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट यावेळी फ्लॉप ठरला. याच कारणास्तव त्याला ‘द कश्मीर फाइल्स’ची खोटी स्तुती करावी लागली.” असं स्पष्टपणे विवेक यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं.

आणखी वाचा – Photos : धाकड गर्ल कंगनाचं साडीत खुललं सौंदर्य, मोहक अंदाज पाहून चाहतेही झाले फिदा

पुढे बोलताना ते म्हणाले, ” ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चालला. पण तुझा चित्रपट मात्र चालला नाही. हा प्रश्न सतत एका व्यक्तीला विचारला गेला तर तो व्यक्ती सारखं काय उत्तर देणार? आपल्या पाठी कोणीच आपलं कौतुक करत नाही. चित्रपटाचं कौतुक करणारा एकही मॅसेज कोणी मला केला नाही. अक्षय स्वतःच्या चित्रपटाचं प्रमोशन करायला जात होता आणि त्याला ‘द कश्मीर फाइल्स’बाबत प्रश्न विचारले जात होते. मग अशावेळी त्याला उत्तर द्यावं लागत होतं.”

आणखी वाचा – रॅपर बादशाहने खरेदी केली इतकी महागडी कार, किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द कश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका अगदी उत्तम रित्या रुपेरी पडद्यावर मांडल्या. या चित्रपटाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर तब्बल ४७. ८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर ५ व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल १८ कोटी रुपयांची कमाई केली.