scorecardresearch

बीफसंबंधी व्हिडीओवर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण, रणबीरची केली पाठराखण

विवेक अग्निहोत्री यांचा बीफसंबंधी व्हिडीओ व्हायरल झाला होता.

बीफसंबंधी व्हिडीओवर विवेक अग्निहोत्रींचं स्पष्टीकरण, रणबीरची केली पाठराखण
'द कश्मीर फाइल्स' दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एका जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता.

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो बीफबद्दल बोलताना दिसला होता. बीफ खाणं त्याला आवडतं असं त्यानं म्हटलं होतं. ११ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भडकले होते. त्याच्या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात होती. अशातच ‘द कश्मीर फाइल्स’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा एका जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तेही बीफ खाण्यासंबंधी बोलताना दिसले होते. ज्यानंतर लोकांनी त्यांनाही बरंच सुनावलं होतं. त्यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यात त्यांनी हा व्हिडीओ एडीट केला गेल्याचं म्हटलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी अलिकडेच ‘ब्रूट इंडिया’ला मुलाखतीत दिली होती. या मुलाखतीत त्याच्या व्हायरल झालेल्या बीफसंबंधी व्हिडीओबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, “काहीच कारण नसताना लोक अशा गोष्टी बाहेर आणतात. एक व्हिडीओ क्लिप ते चालवत आहेत. त्यात आवाज एडिट करण्यात आला आहे. ठीक आहे, तो एका चॅनेलला देण्यात आला होता आणि मी म्हणालो होतो की मी बीफ खायचो. आता मी खात नाही. त्यांनी त्यातला ‘नाही’ हा शब्द एडिट केला. त्यामुळे मी आजही बीफ खातो असं ऐकणाऱ्याला वाटत आहे. त्यांनी हे सर्व केलं आहे, पण ठीक आहे. जेव्हा मी गेममध्ये असतो तेव्हा मला काहीच समस्या नसते.”

आणखी वाचा- “बॉलिवूड हे माफियासारखं…” घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विवेक अग्निहोत्री भडकले

याच मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी ते बीफ नाही तर बफेलो(म्हैस)बद्दल बोलले होते. ते म्हणाले, “काही असे लोक असतात ज्यांना तुम्ही अजिबात आवडत नाही. ते तुम्हाला विरोध करतात. तुम्हाला बदनाम करू पाहतात. तुमची खिल्ली उडवतात. पण माझ्यावर विश्वास ठेवा याच्याशी मला काहीच समस्या नाही. मला माहीत आहे मी कोणता खेळ खेळत आहे. मला खेळाचे नियम माहीत आहेत. मला माहीत आहे की मला कोणी कोणत्या गोष्टी करून दुखावू शकतात. पण याच्याशी मला काहीच समस्या नाही आणि बीफच्या पुष्टीबाबत बोलायचं तर ते ऐकल्यानंतर असं वाटतंय की मी रोजच बीफ खातो. पण सत्य हे आहे की भारतात तुम्हाला बीफ अर्थात गोमांस मिळत नाही. ते बफेलो (म्हैस) आहे.”

दरम्यान याच मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी रणबीर कपूरचीही पाठराखण केली आहे. त्यांनी रणबीरच्या बीफसंबंधी वक्तव्याचं समर्थन केलं आहे. खाणं हा प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्याला जुन्या व्हिडीओवरून अशाप्रकारे टार्गेट केलं जाणं अतिशय चुकीचं आहे. असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या