War 2 Movie Trailer : २०२५ च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘वॉर २’ची लोक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता निर्मात्यांनी त्यांचा आनंद द्विगुणीत केला आहे. कारण- आज २५ जुलै रोजी त्यांनी हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.
या ट्रेलरमध्ये दोन्ही स्टार्समध्ये जबरदस्त टक्कर दिसून येते. त्याच वेळी त्यांच्याबरोबर चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीही दिसत आहे, जी पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन अवतारात दिसणार आहे.
हा दोन मिनिटे ३५ सेकंदांचा ट्रेलर हृतिक रोशनच्या कबीर या व्यक्तिरेखेने सुरू होतो. त्याच वेळी ट्रेलरच्या मध्यभागी कियारा अडवाणी आणि हृतिक रोशन यांच्यात रोमँटिक केमिस्ट्रीदेखील दिसून येईल. कियाराने चित्रपटात एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
‘वॉर २’च्या ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह चित्रपटातील संपूर्ण कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटाबद्दल लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे. तसेच संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करणार आहे.
‘वॉर २’मध्ये पाहायला मिळणार जबरदस्त अॅक्शन
‘वॉर २’च्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आहे. अनेक दृश्यांमध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर समोरासमोर दिसत आहेत. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे की हा चित्रपट अॅक्शन्सनी पूर्णत: भरलेला असणार आहे. या सर्व बाबींव्यतिरिक्त आशुतोष राणादेखील चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ट्रेलरच्या शेवट, हृतिक आणि ज्युनियर एनटीआर दोघेही भगवद्गीतेतील एक श्लोक वाचून चित्रपटाचा शेवट करतात.
‘वॉर २’ कधी प्रदर्शित होणार?
‘वॉर २’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. ‘वॉर २’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘वॉर’चा पुढचा भाग आहे. ‘वॉर’मध्ये टायगर श्रॉफ हृतिक रोशनबरोबर मुख्य भूमिकेत दिसला होता. यावेळी ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’मध्ये हृतिक रोशनबरोबर टक्कर देताना दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘वॉर २’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. ज्युनियर एनटीआर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. ट्रेलरमध्ये त्याची स्टाईल आणि मजबूत व्यक्तिरेखा पाहून असे दिसते की, ‘वॉर २’ हा ज्युनियर एनटीआरसाठी बॉलीवूडमध्ये सुरुवात करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तसेच ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याचे बॉलीवूडमधील पदार्पण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.