scorecardresearch

पाहा : सुभाष घई यांच्या ‘कांची’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर

बॉलिवूडमध्ये ‘शो-मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेल्या सुभष घई यांच्या ‘कांची’ या आगामी चित्रपटाची सर्वजण अतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर चित्रपटकर्त्यांकडून प्रसिध्द करण्यात आले आहे.

पाहा : सुभाष घई यांच्या ‘कांची’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर

बॉलिवूडमध्ये ‘शो-मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेल्या सुभष घई यांच्या ‘कांची’ या आगामी चित्रपटाची सर्वजण अतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे ट्रेलर चित्रपटकर्त्यांकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटातील नवतारका मिष्ठी समाजातील वाईट प्रवृत्तींशी लढणाऱ्या एका खेडवळ मुलीच्या भूमिकेत दिसते. त्याचबरोबर तिचे गावातील एका तरूणावर प्रेम असल्याचे देखील या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. सदर तरूणाची भूमिका कार्तिक आर्यनने साकारली आहे. कार्तिकने या आधी ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटात काम केले आहे. ट्रेलरमध्ये हे दोघेजण तरूणांना खोटी आश्वासन देणारे राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराविरूध्द लढण्याचे आवाहन करताना दिसतात. ‘मुक्ता आर्टस्’च्या या चित्रपटात ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, चंदन रॉय सन्याल इत्यादींच्या देखील भूमिका आहेत. २५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2014 at 08:30 IST

संबंधित बातम्या