काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपटात केलं गेलेलं रामायणाचं चुकीचं चित्रण आणि खराब व्हीएफएक्स यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड विरोध केला. यानंतर चित्रपटातील संवाद आणि काही सीन्स बदलण्यात आले पण तरीही ‘आदिपुरुष’ला प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला. दिग्दर्शक ओम राऊत, लेखक मनोज मुंतशीर आणि मुख्य अभिनेता प्रभास यांच्यावरही लोकांनी प्रचंड टीका केली.

सुपरस्टार प्रभासला एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटाने प्रभासला ‘पॅन-इंडिया’ स्टार बनवले. त्यानंतर आलेले प्रभासचे चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले. प्रभासच्या एकाही चित्रपटाला ‘बाहुबली’सारखं यश मिळालं नाही कारण प्रत्येकवेळी त्याच्या नव्या चित्रपटाची तुलना ही ‘बाहुबली’बरोबरच होत होती. यानंतरच ‘राजामौली शाप’ याबद्दल इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू झाली.

Kolhapur, Protestors Demand Ban on Maharaj film, Protestors Demand Ban on Aamir Khan s Son Junaid Khan s Film Maharaj , Defaming Hindu Saints, marathi news, kolhapur news,
आमिर खानचा मुलगा प्रदर्शनापूर्वी गाजू लागला; ‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
Loksatta viva Cannes International Film Festival for Indians important
कानच्या निमित्ताने..
Janhvi Kapoor, fan,
जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
Marathi Drama Gela Madhav Kunikade
प्रशांत दामलेंनी उलगडलं ६३ चं कोडं! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
Payal Kapadia,
व्यवस्थेविरुद्ध आंदोलन ते प्रतिष्ठेच्या कान महोत्सवात पुरस्कार… एफटीआयआयची माजी विद्यार्थिनी पायल कपाडियाचा कसा झाला लक्षवेधी प्रवास?
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार
_Morgan spurlock exposes fast food industry
‘मॅकडोनाल्ड’ कंपनीला दणका देणारे मॉर्गन स्परलॉक कोण होते?

आणखी वाचा : ‘OMG 2’ पाठोपाठ ‘गदर २’वरही चालली सेन्सॉरची कात्री; CBFC ने सुचवले ‘हे’ १० बदल

टॉलीवुडमध्ये अशी मान्यता आहे की एसएस राजामौली यांच्याबरोबर जो अभिनेता काम करतो त्याचे त्यानंतरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. ही गोष्ट कदाचित अंधश्रद्धा वाटू शकते पण ही गोष्ट प्रामुख्याने दोन मोठ्या सुपरस्टार्सच्या बाबतीत खरी ठरली आहे. राम चरण आणि प्रभास या दोन्ही अभिनेत्यांच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली.

२००९ मध्ये राजामौली यांच्यासह ‘मगधीरा’सारखा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर राम चरणचा २०१० मध्ये आलेला ‘ऑरेंज’ हा चित्रपट सपशेल आपटला. नुकतंच ‘आरआरआर’नंतरसुद्धा हीच गोष्ट घडली, एवढा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर राम चरणचा ‘आचार्य’ ठरला. राजामौली शापाचा फटका अजय देवगणलाही बसला. ‘आरआरआर’मध्ये छोटीशी भूमिका करणाऱ्या अजय देवगणचा त्यानंतर आलेला ‘रनवे ३४’ हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

आणखी वाचा : ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या कमाईत घट; आठवड्याभरातही १०० कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण

या शापातून प्रभासचं करिअरही वाचलेलं नाही. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रभासचे त्यानंतरचे सलग चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ तर बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. आता टॉलीवुडमधील ‘राजामौली शाप’ या संकल्पनेला ज्युनिअर एनटीआर छेद देणार का याकडे आता बऱ्याच लोकांच्या नजरा आहेत.

‘आरआरआर’च्या अभूतपूर्व यशानंतर ‘एनटीआर३०’ हा ज्युनिअर एनटीआरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्युनिअर एनटीआरचा हा आगामी चित्रपट कोरटाला शीव दिग्दर्शित करणार आहेत. ‘राजामौली शाप’ या मान्यतेप्रमाणे ज्युनिअर एनटीआरचा हा चित्रपट फ्लॉप ठरणार की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पसरलेला हा गैरसमज दूर करणार ते येणारा काळच ठरवेल.