Sanjay Dutt Love Life : संजय दत्त त्याच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत होता. कधी त्याच्या अफेअर्सची चर्चा व्हायची, कधी त्याच्या लग्नाची. बेकायदा शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती.
संजय दत्तच्या डेटिंग लाईफबद्दल बोलताना त्याचे नाव माधुरी दीक्षितपासून टीना मुनीमपर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. एकदा संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने एकाच वेळी तीन महिलांना डेट केले होते.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तला डबल डेटिंगबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. संजय दत्त म्हणाला होता, “तुम्हाला हुशार असायला हवे. दुसऱ्याबरोबर काय चालले आहे हे कोणालाही कळू नये.” “लोकांचे प्रेम मिळणे हे चांगले असते, विशेषतः महिलांकडून” असं तो पुढे म्हणाला. त्यानंतर त्याने हेही उघड केले की, त्याने एकाच वेळी तीन महिलांना डेट केले होते.
संजय दत्तचेही माधुरी दीक्षितबरोबर अफेअर होते आणि अभिनेत्याची पहिली पत्नी रिचाच्या बहिणीनेही अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत संजय दत्तच्या मेहुणीने माधुरीला ‘घर तोडणारी’ म्हटले होते. ती माणूस नाही, कारण तिने माझ्या बहिणीचे घर तोडले असेही म्हटले होते.
पण, संजय दत्तचे टीना मुनीमबरोबरचे प्रेमसंबंध माधुरीपेक्षा जास्त चर्चेत होते. दोघेही बालपणीचे मित्र होते आणि ८० च्या दशकात ते एकमेकांच्या जवळ आले होते. संजय दत्तने एकदा ‘स्टारडस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत टीना मुनीमबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. संजय म्हणाला होता की, तो टीनाबद्दल खूप भावनिक होता. ती त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती. पण, संजय म्हणाला की त्याने टीनाला तिच्या करिअरशी संबंधित निर्णय कधीच घेऊ दिले नाहीत. पण, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
मान्यता दत्तबरोबर आनंदी जीवन
संजय दत्त आता त्याची पत्नी मान्यता दत्तबरोबर आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्रिशाला दत्त ही मुलगी आहे, तर मान्यतापासून त्याला जुळी मुले आहेत.
संजय दत्तने १९८१ मध्ये ‘रॉकी’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘रॉकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्या वर्षात तो सर्वांत जास्त कमाई करणारा १० वा चित्रपट होता.