एक काळ असा होता जेव्हा अमृता सिंह आणि सैफ अली खान एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघांचेही एकमेकांवर इतके प्रेम होते की, त्यांनी १९९१ मध्ये पळून जाऊन लग्न केले. अमृताने सैफशी लग्न करण्यासाठी केवळ धर्मच बदलला नाही, तर चित्रपटही करणेही सोडले आणि नंतर ती दोन मुलांची आई बनली. पण, १९९१ मध्ये लग्न झाल्यानंतर दोघांचा २००४ मध्ये घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर सैफने अमृतावर अनेक आरोप केले असले तरी अभिनेत्री गप्प राहिली. सैफ आणि अमृताच्या घटस्फोटाचे कारण उघड झाले नाही. परंतु, काही वृत्तांत असा दावा केला गेला आहे की, सैफच्या विवाहबाह्य संबंधांमुळे घटस्फोट झाला.
अमृता सिंह काय म्हणालेली?
अमृता सिंहने एकदा पूजा बेदीच्या शोमध्ये सांगितले होते की, सैफपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती का गप्प राहिली. तिने तिची बाजू सर्वांसमोर का मांडली नाही. त्यावर अमृताने म्हटले होते की, तोपर्यंत लोकांसमोर बरेच काही सांगितले गेले होते आणि तिच्याकडे सांगण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. तसेच, तिला तिची मानसिक शांती गमवायची नव्हती. कारण- तिला एकटीने मुलांची काळजी घ्यावी लागत होती.
अमृता म्हणाली होती, “इतके काही केले जात होते आणि इतके उघडपणे सांगितले जात होते की, मी आणखी काय बोलू शकत होते? हे माझे वैयक्तिक मत आहे. हे माझे स्वतःचे दुःख आहे, जे मला कोणाबरोबरही शेअर करण्याची गरज नाही किंवा मला ते कोणाबरोबरही शेअर करावेसे वाटले नाही. माझ्या प्राधान्यात इतरही गोष्टी होत्या, ज्यावर मला लक्ष केंद्रित करायचे होते… जसे की माझी मुले. परंतु, मीडिया आणि सर्व काही जाणून घेण्यास उत्सुक असलेले लोक माझे प्राधान्य नव्हते.”
सैफ आणि अमृताची पहिली भेट
सैफ आणि अमृताची पहिली भेट ‘बेखुदी’ चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यावेळी अमृता तिच्या करिअरच्या शिखरावर होती आणि सैफ संघर्ष करत होता. तेव्हापासून सैफने अमृतावर प्रेम करायला सुरुवात केली आणि एके दिवशी तो तिच्या घरीही पोहोचला. त्यावेळी सैफ २० वर्षांचा होता आणि अमृता त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. सैफने अजिबात संकोच केला नाही आणि अमृताला डेटवर येतेस का म्हणून विचारले.
अमृताने सैफवर तिला पोटगीसाठी पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अमृताने सैफकडे तिचा मुलगा इब्राहिम १८ वर्षांचा होईपर्यंत पाच कोटी रुपये पोटगी आणि दरमहा एक लाख रुपये मागितले होते.