प्रवासी जहाजावर अंमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. यामुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. या संपूर्ण प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चांगलंच गाजत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा एक जुना व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड हे ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलेच गाजत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची नाव ड्रग्स केसप्रकरणी समोर आली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स कनेक्शनबद्दल एनसीबीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची चौकशी केली होती. यात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्ज बाळगाणाऱ्यांवर छापे टाकणारे अधिकारी म्हणून त्यांना विशेष ओळखले जाते. समीर वानखेडे हे IRS अधिकारी असून ते एनसीबीमध्ये सहभागी होण्यापूर्वी सीमाशुल्क विभाग आणि नंतर कर विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच दोन वर्ष त्यांनी माझी बँक खाती गोठवली होती, असा वाईट अनुभव अनुराग कश्यप यांनी यात केला आहे.

D Y Chandrachud News in Marathi
‘न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न’; २१ निवृत्त न्यायाधीशांनी डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहित व्यक्त केली चिंता
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Hindu Marriage Act
“हिंदू विवाह कायद्यांतर्गत ‘कन्यादान’ आवश्यक नाही, तर…”; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय
chief justice dy chandrachud
‘मी व्हिस्कीचा चाहता’, सर्वोच्च न्यायालयात वकिलांनी असं म्हटल्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले…

“बॉलिवूड आणि ड्रग्ज याप्रकरणी अनुराग कश्यप यांच्या एका मुलाखतीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात त्यांना समीर वानखेडेंबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी समीर वानखेडेंबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. समीर वानखेडेंना बॉलिवूडवर हल्ले करायला आवडते,” असे विधान अनुराग कश्यप यांनी केले आहे.

सारा अली खान ते आर्यन खान, ‘या’ सेलिब्रेटींची ड्रग्जप्रकरणी चौकशी

अनुराग कश्यप पुढे म्हणाले, “बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबद्दल काही वृत्तमाध्यमांकडे तपासाबद्दलची सर्व माहिती एनसीबीकडून अधिकृतद्वारे जाहीर करण्यापूर्वीच आलेली असते. ही माहिती समोर आल्यानंतर एनसीबी ती नाकारते. असा अजेंडा तुम्ही पाहिलात का? समीर वानखेडे हे एनसीबीचे प्रमुख अधिकारी आहेत. समीर वानखेडे नेमके कोण आहेत? वानखेडे यांनी यापूर्वी सीमाशुल्क विभाग आणि त्यानंतर कर विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे. त्याला बॉलिवूडवर हल्ले करायला आवडते,” असे अनुराग कश्यप म्हणाले.

“वानखेडेंनी तब्बल दोन वर्ष माझे बँक खाते गोठवले होते. जेव्हा मी याप्रकरणी त्याला कोर्टात खेचले आणि याप्रकरणी सुनावणी सुरु होणार त्याच्या १५ मिनिट अगोदर ते पुन्हा पूर्ववत करण्यात आले. त्याला नेहमीच बॉलिवूडशी जोडलेलं राहणं आवडतं. ते नेहमीच प्रसारमाध्यमांसोबत विविध विधान करत असतात,” असेही अनुराग कश्यप यांनी सांगितले.

दरम्यान या संपूर्ण मुलाखतीतील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवाब मलिक यांनी रिट्वीट केला आहे. त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.