बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघ सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. तसचं इंग्लड दौऱ्यावर अथियादेखील राहुलसोबत इंग्लडमध्ये ट्रीप एन्जॉय करत असल्याचं सोशल मीडियावरील फोटोमधून दिसलं होतं. सोशल मीडियावर राहुल आणि अथिया एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. नुकतच क्रिकेटर केएल राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक लाइव्ह सेशन केलं होतं. यात त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची हटके स्टाइलने उत्तर दिली. यावेळी अथियाने देखील राहुलला एक प्रश्न विचारला ज्याचं राहुलने दिलेलं उत्तर खूपच मजेशीर दिलंय.

केएल राहुलच्या या लाइव्ह सेशनमध्ये अथिया म्हणाली, ” तू मला फेसटाइम (व्हि़डीओ कॉल) करायला हवा” यावर राहूलने एक खास फोटो शेअर करत उत्तर दिलं आहे. राहुलने एका मांजरीच्या कॉस्च्युममधील व्यक्तीसोबत फोटो शेअर केलाय. “जेव्हा तू व्हिडीओ कॉल उचलत नाहीस तेव्हा माझा चेहरा असा असतो” असं म्हणत राहुलने या फोटोमध्ये अथियाला टॅग केलं आहे. राहुलच्या या उत्तराने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

“होय ते थोडं वेदनादायी होतं”, समांथापासून विभक्त होणाच्या चर्चांवर नागा चैतन्यने व्यक्त केल्या भावना

ज्युनिअर एनटीआरनं त्याच्या लॅम्बॉर्गिनीसाठी घेतली १७ लाखांची नंबर प्लेट; गाडीचा नंबर आहे…

एका ब्रॅण्डच्या जाहिरातीदरम्यान अथिया आणि राहुलची मैत्री झाली. भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर असताना राहुल आणि अथियाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या टूरवर दोघसोबत गेल्याचं त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लक्षात आलं. असं असलं तरी अद्याप दोघांनी त्याच्या रिलेशनशिपबद्दर जाहीरपणे कबुली दिलेली नाही.