प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं ६९ वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे.

पण एकदा बप्पी लहरी यांच्यामुळे भारतीय संगीतसृष्टीत एका नव्या कौशल्याची भर पडली होती. त्यांच्या पॉप गाण्यांनी प्रेक्षकांना प्रचंड भुरळ पडली होती. प्रेक्षक त्यांच्या गाण्यांकडे प्रचंड आकर्षित होत होते. त्यांच्यामुळे प्रेक्षकांना डिस्को सॉन्गची गोडी लागली. हे झालं चाहत्यांचं पण तुम्हाला माहिती आहे का? सर्वांना वेड लावणारा स्टार मायकल जॅक्सन यालासुद्धा बप्पीदांची भुरळ पडली होती.

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Four Year Old Girl Tortured in Hadapsar Pune
धक्कादायक : खाऊच्या आमिषाने चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार

असे म्हटले जाते की, एकदा मायकल जॅक्सन मुंबईत आला होता. तेव्हा त्याची भेट बप्पी लहरी यांच्याशी झाली. या विषयी स्वत: बप्पी लहरी यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते. “जेव्हा तो मुंबईत आले होते. तेव्हा मी जागी बसलो होतो. मायकल जॅक्सन माझ्याकडे आला तेव्हा त्याची नजर माझ्या गणपतीच्या चेन वर पडली.” तो म्हणाला- “फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? तुमची चेन अप्रतिम आहे.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

पुढे मायकल जॅक्सनने त्यांना विचारले की “तुम्ही कंपोजर आहात का? मी म्हणालो हो मी कंपोजर आहे. डिस्को डान्सर हे माझं गाणं आहे. जसं मी डिस्को डान्सर बोललो तसं मायकल जॅक्सन म्हणाला, की मला तुझं जिम्मी-जिम्मी गाणं प्रचंड आवडलं होतं. त्यानंतर मायकल जॅक्सनने त्याच्या लाईव्ह शोमध्ये बप्पी लहरी यांना बोलावले होते.”

आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती

बप्पी लहरी यांनी वयाच्या २१व्या वर्षी बॉलिवूडमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली.