Bigg Boss 19 Tanya Mittal : प्रसिद्ध व वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’मध्ये यावेळी अनेक स्पर्धकांनी भाग घेतला आहे, त्यापैकी एक आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल. घरात प्रवेश केल्यापासून तान्या चर्चेत आहे. काही लोकांना तिचे बोलणे आवडले आहे, तर काहींना तिचे बोलणे आवडले नाही. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत आहे.
खरं तर, ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी तान्या मित्तल अनेक पॉडकास्टमध्ये दिसली आहे. आता तिथून तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने खुलासा केला आहे की, तिचा बॉयफ्रेंड तिला सोडून गेला. कारण- ती सुंदर दिसत नव्हती. अशा परिस्थितीत तिने याचा बदला घेण्यासाठी कठोर परिश्रम केले.
तान्याने बॉयफ्रेंडसाठी सोडले तिचे शिक्षण
तान्या पॉडकास्टमध्ये म्हणाली होती, “माझे २०१८ मध्ये ब्रेकअप झाले आणि मी सुंदर नव्हते म्हणून त्यानं मला सोडलं. म्हणजे यापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही. त्याच्यासाठी मी कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून आले होते आणि त्यामुळे माझे कुटुंब आधीच माझ्या विरोधात होते. मला वाटायचे की, जर जगात कोणी मला साथ दिली नाही तरी तो देईल. जर मी काहीही करू शकले नाही, तर मी त्याच्याशी लग्न करेन. आम्ही नेहमीच एकत्र राहू.”
पुढे ती म्हणाली, “मी एक चांगली बायको झाली असती, पण त्यानं माझ्याशी संबंध तोडले आणि म्हटले की, तू सुंदर दिसत नाहीस. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी मी सुंदर झाले. मी पुन्हा १५ किलो वजन कमी केले. मला स्वतःचा खूप राग आला. चेहऱ्यावर बेसन, दही लावले आणि मग मला समजलं की सौंदर्योपचारसुद्धा असतात. लोक म्हणाले की, दिल्लीला जा, व्हिटॅमिन सी खा, ग्लुटाथियोन खा. मी सर्व प्रयत्न केले. मला काहीही करून सुंदर व्हायचं होतं. आता जेव्हा इतके लोक मला सुंदर म्हणतात, तेव्हा तोच माझा त्याच्याविरुद्धचा सर्वांत मोठा सूड आहे.”
तान्या मित्तल ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि सध्या तिच्या फॅशन व स्टाईल, तसेच तिच्या लाईफस्टाईलमुळे ती चर्चेत आहे. शोमध्ये आणि बाहेर प्रत्येक जण तिच्याबद्दल बोलत आहे. पहिल्याच दिवसापासून तान्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.