Dharmendra Called Rekha Laadli : धर्मेंद्र हे बॉलीवूडमधील ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्या काळी अनेक चित्रपटांतून काम केलं होतं. धर्मेंद्र आता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि जुन्या आठवणींचे फोटो शेअर करीत आहेत. धर्मेंद्र आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का? धर्मेंद्र रेखा यांना एका खास नावाने हाक मारतात.
धर्मेंद्र यांनी रेखा यांच्याबरोबरचा एक जुना ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये रेखा धर्मेंद्र यांचा गाल ओढताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांनी तो फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन दिली, “मैत्रीण, रेखा नेहमीच आमच्या कुटुंबाची लाडली राहील.” सनी देओलने कमेंट सेक्शनमध्ये हार्ट्सदेखील पोस्ट केले.
धर्मेंद्र आणि रेखा यांनी अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये ‘राम बलराम’, ‘कर्तव्य’, ‘कहानी’, ‘कहानी सुहाग की’, ‘कहानी किस्मत की’, ‘बाजी’, ‘जान हथेली पर’, व ‘झूठा सच्चा’ यांचा समावेश आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.
रेखाव्यतिरिक्त जया बच्चनदेखील धर्मेंद्र यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. त्यांनी २०२३ मध्ये आलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात जया बच्चन यांच्याबरोबर काम केले होते आणि चित्रपटातील एक फोटो शेअर करताना धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांना त्यांची ‘गुडीया’ म्हटले होते.
अलीकडेच धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र बसलेले आहेत आणि जया त्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “गुड्डी नेहमीच माझी लाडकी गुडीया राहील. ती एक आंतरराष्ट्रीय कलाकार आहे आणि नेहमीच माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगते.”
धर्मेंद्र हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. ते चाहत्यांसाठी काही ना काही शेअर करीत असतात. त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या पोस्टची उत्सुकता असते. कारण- त्यांच्या पोस्टमधून नेहमी त्यांची वेगळी एनर्जी पाहायला मिळते. धर्मेंद्र आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावर शेअर करीत असतात. सध्या ते चित्रपटांमध्ये कमी दिसतात; पण त्यांचे आयुष्य आनंदाने जगत आहेत.