Salman Khan Talked About Her Step Mother Helen : बॉलीवूडच्या खान कुटुंबाला आज कोणी ओळखत नाही असं कोणीच नाही. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर कायम खान कुटुंबाबद्दल चर्चा रंगलेल्या असतात.
बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेता सलमान खान याने बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. तर अरबाज आणि सोहेल यांनीदेखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सिनेमांमध्ये अग्रेसर असताना खान कुटुंब खासगी गोष्टीमुळे कायम चर्चेत असतं.
सलीम खान यांनी १९६४ मध्ये सलमा खान यांच्याबरोबर लग्न केलं. सलमा आणि सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान अशी त्यांच्या चार मुलांची नावे आहेत.
चार मुलांच्या जन्मानंतरदेखील सलीम खान यांनी १९८१ मध्ये हेलन यांच्याबरोबर लग्न केलं. सलीम यांना चार मुलं असल्यामुळे हेलन यांनी कधीच स्वतःच्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला नाही.
५० आणि ६० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या हेलन या सलमान खानची दुसरी आई आहेत. सलमान खान आणि त्याची सावत्र आई हेलन खान यांच्यात खूप खास नाते आहे.
हेलन यांना त्यांच्या कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी खान कुटुंबाला बराच वेळ लागला. सलमान आणि त्याच्या इतर भावंडांनी हेलन यांना केवळ आईचा दर्जा दिला नाही तर त्यांना सार्वजनिकरित्या स्वीकारले. २००१ च्या गोल्डन गर्ल कॉन्सर्टचा एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये सलमान खान त्याची आई हेलन यांची सर्वांसमोर ओळख करून देताना दिसत आहे.
ती माझी आई आहे : सलमान खान
सलमान खानचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ २००१ मध्ये झालेल्या गोल्डन गर्ल कॉन्सर्टमधील आहे. येथे सलमानला स्टेजवर बोलावले जाते आणि नंतर त्याची आई हेलन यांच्या सन्मानार्थ तो जे बोलतो ते ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेले लोक टाळ्या वाजवू लागतात. सलमान म्हणतो की, लोक म्हणतात की चित्रपटसृष्टीत तीन खान आहेत, सलमान, शाहरुख आणि आमिर. पण, इंडस्ट्रीमध्ये एक चौथा खान देखील आहे, जो आपल्या सर्वांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये होता आणि तो म्हणजे हेलन खान. ती माझी आई आहे आणि आम्हाला तिचा अभिमान आहे. यानंतर हेलन एंट्री करतात आणि सलमानबरोबर नाचू लागतात. २४ वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओमध्ये सलमान आणि हेलन यांच्यामधील नाते सुंदरपणे दिसून येते.
शोले चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, हेलन आणि सलीम खान भेटले आणि प्रेमात पडले. दोघांनीही त्यांच्या नात्याला एक नाव दिले आणि १९८१ मध्ये लग्न केले. सलीम खान आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुले होती.