When Tanushree Dutta accused Vivek Agnihotri of mistreatment : बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहे की, चार-पाच वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे.

या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तिला घरात मानसिक त्रासाला, तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच तिला मदतीची गरज आहे, असेदेखील तिने म्हटले आहे.

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या तनुश्री दत्ताने ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याबरोबर काम करण्याचा तिचा वाईट अनुभव शेअर केला होता. एका जुन्या मुलाखतीत तिने सांगितले होते की, जेव्हा ती शूटिंगला पाच मिनिटे उशिरा पोहोचली तेव्हा ते तिच्यावर ओरडले होते.

२००५ मध्ये आलेल्या ‘चॉकलेट’ चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांच्याबरोबर अभिनेत्री तनुश्री दत्ताने काम केले होते. तिने फरीदून शहरयारशी झालेल्या संभाषणात तिचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली होती, “एके दिवशी मी सेटवर पाच मिनिटे उशिरा पोहोचले तेव्हा ते माझ्यावर ओरडले आणि मला अनप्रोफेशनल म्हटले. कधी कधी लाईटही चालू केलेली नसायची तेव्हा मी सेटवर येत असे. काही सेट्स तयार नसायचे. म्हणजे जो काही सेटअप आहे, काहीही तयार नसायचे. पण एके दिवशी मी थोडी उशिरा आली. पाच मिनिटे, अगदी पाच मिनिटे आणि ते फक्त मी आले आहे की नाही हे पाहण्यासाठी सेटवर आले होते.”

तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्री यांच्यावर केले होते आरोप

तनुश्री दत्ताने सांगितले की, विवेक यांनी अभिनेत्रीला व्हॅनमध्ये आराम करण्यास किंवा स्वतःला रोबने झाकण्यास नकार दिला होता. तनुश्रीने सांगितले होते, “जेव्हा कलाकार शूटिंग करत नसतात तेव्हा ते व्हॅनमध्ये आराम करतात. विशेषतः जर तुम्ही मला असे कपडे दिले असतील, जसे की शॉर्ट कपडे. मी कधी कधी ‘रोब’ घालून बसायची, तर ते म्हणायचे, शॉट येणार आहे त्यामुळे तो रोब काढून टाक. ते मला संपूर्ण युनिटसमोर शॉर्ट स्कर्टमध्ये बसवायचे.”

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर विवेक अग्निहोत्री यांनी दिली होती प्रतिक्रिया

शुभंकर मिश्रा यांच्याशी झालेल्या संभाषणात विवेक यांनी तनुश्रीच्या आरोपांवर आपली बाजू मांडली होती. ते म्हणाले होते, “चित्रपटसृष्टीत अशी गोष्ट आहे की, यशस्वी होण्यासाठी अभिनेते आणि अभिनेत्रींवर खूप दबाव असतो. जेव्हा तुम्ही यशस्वी होत नाही तेव्हा तुम्ही अनेक वेळा निराश होता, ज्यामुळे तुम्हाला तुमची मानसिक स्थिती काय आहे हेदेखील कळत नाही. तुम्ही त्या मर्यादेत राहू शकत नाही.” ते पुढे म्हणाले होते की, अशा प्रकरणांमध्ये तो लोकांना क्षमा करणे पसंत करतो आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, अभिनेत्री आणि इमरान हाश्मीची जोडी खूप गाजली होती. तिने ‘हॉर्न ओके प्लीज’सारख्या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांच्यासारख्या स्टार्सबरोबर काम केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.