लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व अभिनेत्री कुशा कपिला पतीपासून विभक्त होत आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची घोषणा केली आहे. कुशाच्या पतीचे नाव जोरावर सिंग अहलूवालिया असून सहा वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. लग्नाआधी जवळपास पाच वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. कुशाचा तिचा पती जोरावर सिंग अहलूवालिया कोण आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

सहा वर्षांचा संसार मोडला, कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, “नात्याचा शेवट…”

जोरावर कुशाप्रमाणेच कंटेंट क्रिएटर आहे. २० फेब्रुवारी १९८७ रोजी चंदीगडमधील एका मध्यमवर्गीय शीख कुटुंबात जन्मलेल्या जोरावरने शिमला येथील प्रसिद्ध बिशप कॉटन स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने पंजाब कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून बीबीए केले आणि २०१० मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमधून मार्केटिंग आणि फायनॅन्समध्ये एमबीए पूर्ण केले.

कोकणातील गावी पोहोचला भाऊ कदम, कौलारू घरातील लाकडी फळीवर लिहिलेली ‘ती’ दोन वाक्ये चर्चेत

जोरावरने पोस्ट ग्रॅज्युएशनपूर्वी लुधियाना येथील पारस स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून एक वर्ष काम केले. दिल्लीत एमबीए केल्यानंतर तो २०११ मध्ये युनायटेड ब्रुअरीजमध्ये जवळजवळ दोन वर्षे अकाउंट एक्झेक्युटिव्ह म्हणून रुजू झाला. त्यानंतर जोरावरने एचटी मीडिया लिमिटेडमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून चार महिने काम केले. नंतर तो डियाजिओ इंडियामध्ये रुजू झाला आणि २०१४ ते २०२१ पर्यंत जवळपास सात वर्षे तिथेच काम करत राहिला. नंतर त्याने त्याची चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोकरी सोडल्यावर तो कंटेंट क्रिएटर बनला. त्याचे Zor & More नावाचे युट्यूब चॅनेल आहे. तिथे त्याने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. याशिवाय तो इन्स्टाग्रामवर मजेदार रील्स शेअर करत असतो. अनेकदा त्याने कुशाबरोबरही रील्स बनवले होते. दरम्यान, सोमवारी कुशा व जोरावर दोघांनीही पोस्ट शेअर करून त्यांच्या घटस्फोटाबद्दल माहिती दिली.