Video : मराठी मालिकांमध्ये सगळ्या ब्राह्मण अभिनेत्रीच का?, सुजय डहाकेचा प्रश्न

‘लोकसत्ता ऑनलाइल’ना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा प्रश्न उभा केला आहे

नुकताच ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने लोकसत्ता ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. “सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?” असा प्रश्न सुजयने विचारला आहे.

सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा चित्रपट २६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचातुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Why bramhin girls are always in main lead in marathi daily soap avb