मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटात शाहीर साबळेंच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी झळकणार आहे.

शाहीर साबळेंच्या भूमिकेसाठी केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीवरुन केदार शिंदेंना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. नुकतंच त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर करत उत्तर दिले आहे. केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी शाहीर साबळे आणि अंकुश चौधरीचा एक कोलाज फोटो शेअर केला आहे.

उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”

केदार शिंदेंची इन्स्टाग्राम पोस्ट

“प्रत्येक जण मला विचारतोय की अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे? तो खुप वेगळा दिसतो. काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा. एक फोटो अंकुश चा आहे आणि दुसरा शाहीर साबळे यांचा!! ही कमाल दी विक्रम गायकवाड टीम यांची… जगदीश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. युगेशा हीने कॉस्च्युम केले आहेत…लोक स्टुडिओ यांनी या सिनेमाचं पोस्टर डिझाईन केलं आहे. ही सुरूवात आहे. अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच पॅशनने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात. श्री स्वामी समर्थ, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सध्या केदार शिंदे यांची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टद्वारे त्यांनी अंकुश चौधरीला या भूमिकेसाठी निवडण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहेत.

Loksatta Exclusive: आनंद दिघेंच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले, “आता बाळासाहेब….”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.