प्रसिद्ध रेसरल आणि अभिनेता जॉन सिनाने त्याच्या एका पोस्टने पुन्हा एकदा भारतीय चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. जॉन सिनाने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीचा एक फोटो शेअर केला आहे. जॉन सिनाने अर्शदचा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी जॉनच्या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
नुकताच अर्शदने एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या फोटोत अर्शदचं ट्रांसफॉर्मेशन दिसून येतंय. अर्शदचा हा फिट अंदाज रेसरल जॉन सिनाच्या देखील पसंतीस पडल्याचं दिसतंय. म्हणूनच जॉनने अर्शदचा हा फोटो शेअर केलाय. जॉन सिना अनेकदा भारतातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे फोटो शेअर करत असतो. जॉनने अर्शदचा फोटो शेअर केल्याने त्याचं भारतावरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय.
हे देखील वाचा: “तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का?”; ‘त्या’ प्रश्नावर समांथा भडकली
View this post on Instagram
जॉनने अर्शद वारसीचा फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. जॉन सिनाचं भारत प्रेम पाहून एक नेटकरी म्हणाला, “जॉन सिना भारतीय आहे.” तर दुसरा युजर म्हणाला, “जॉन भावा तू भारतातचं ये” आणखी एक युजर म्हणाला, “कुणीतरी जॉनला भारतीय नागरिकत्व द्या”
हे देखील वाचा: दिव्या अग्रवाल ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती; ट्रॉफीसह जिंकली ‘इतकी’ रक्कम?

जॉन सिनाने अर्शदचा फोटो शेअर केल्याने एक नेटकरी म्हणाला, “भावा तू भारतातच शिफ्ट हो”. जॉनने अर्शदचा फोटो शेअर केल्याने अनेक नेटकऱ्य़ांनी अर्शदचं देखील कौतुक केलंय़.
एखाद्या भारतीय सेलिब्रिटीचा फोटो शेअर करण्याची जॉन सिनाची ही पहिली वेळ नव्हे. काही दिवसांपूर्वीच त्याने अभिनेता सिद्धार्थ शुल्काच्या आठवणीत सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला होता. २ सप्टेंबरला सिद्धार्थचं निधन झाल्यानंतर जॉनने सिद्धार्थचा फोटो शेअर करत शोक व्यक्त केला होता.