बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून यामी गौतमला ओळखले जाते. यामी सध्या तिचा दसवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात यामीसोबत अभिनेता अभिषेक बच्चनही मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी यामी ही विवाहबंधनात अडकली. ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत यामीने लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अनेक महिन्यानंतर नुकतंच यामीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक मोठ्या डिझायनर्सने माझ्यासोबत भेदभाव केला, असा आरोप तिने केला आहे.

‘दसवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने यामीने ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लग्नावेळी तिच्यासोबत मोठ्या डिझायरने केलेल्या भेदभावाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “माझे लग्न हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दर्शवते. मी स्वत:ला फार भाग्यवान समजते की मला माझ्यासारखा विचार करणारा जोडीदार मिळाला आहे. तुमच्या लग्नाचा दिवस हा तुमचा स्वतःचा असतो. त्यामुळे इतर कोणी त्याबद्दल सूचना द्याव्यात असे तुम्हाला अजिबात वाटत नाही.”

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

“मला ते आवडणार नाही…”, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर शाहिद कपूरची प्रतिक्रिया

“मी माझ्या लग्नाचा लेहंगा एका प्रसिद्ध डिझायनरकडून घेण्यास फार उत्सुक होती. पण त्यावेळी मला असं समजलं की, फॅशन इंडस्ट्रीमध्ये असे काही लोक आहेत जे तुम्हाला त्यांचे कपडे किंवा लेहंगा कधीही देत नाही. कारण तुम्ही त्यासाठी पात्र नाही, असे त्यांना सतत वाटत असते. याच सर्व गोष्टींमुळे मी लग्नात डिझायनर लेहेंगा परिधान करण्याऐवजी माझ्या आईची साडी नेसली होती”, असे यामीने म्हटले.

“एकदा एका मोठ्या डिझायनरने मला तिचा लेहेंगा देण्यास नकार दिला होता. त्यावेळी मला फार वाईट वाटले होते. पण त्यानंतर मी देखील त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. पण ते खूप वाईट होते. मला लेहेंगा न देण्याचे नेमकं कारण काय? हे मला अद्याप समजलेले नाही. तसेच तुम्ही एखाद्याशी इतके वाईट कसे वागू शकता? असा प्रश्नही त्यावेळी मला पडला होता”, असेही यामी म्हणाली.

“मला गरज नाही…”, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या प्रश्नावर महेश बाबूने दिले उत्तर

यामीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अखेरची ‘भूत पोलिस’ या चित्रपटात दिसली होती. सध्या ती दसवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आगामी काळात तिचे ‘लॉस्ट’ आणि ‘ओह माय गॉड २’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. यावर्षी यामीनं दिग्दर्शक आदित्य धरशी गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.