आज सकाळी-सकाळी आमचा बंड्या

हातावर पांढरी पावडर घेऊन

काहीतरी हुंगल्यासारखं करतांना दिसला.

मी जोरात त्याच्या कानशिलात लगावली

आणि ओरडलो, “अरे! तुला तुझा बाप काय कोणी खान वगैरे वाटला की काय?

मी एक सामान्य माणूस आहे.”

एवढ्यात बायकोचा किचनमधून आवाज आला,

“काय करावं बाई या माणसाला? टीव्ही, मोबाईल जरा कमी पहात जा.

मी म्हणालो, “अगं तो…”

त्यावर आमच्या आहो म्हणाल्या, “अगं! काय? अगं!

अहो दिवाळीच्या फराळाचे

बेसन लाडू बनवायला घेतलेत मी.

त्याची पिठीसाखर घेऊन खातोय तो.”