कॅम्पाकोलातील बेकायदा घरांवर शुक्रवारी कारवाई करताना अडथळा आणणाऱ्या रहिवाशांविरुद्ध कलम १४३ (बेकायदा जमाव) कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा)नुसार वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी कॅम्पाकोलातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकाला रहिवाश्यांच्या विरोधामुळे रिकाम्या हातांनी माघारी परतावे लागले होते. त्यानंतर आजसुद्धा (शनिवार) पालिकेने कॅम्पाकोलावरची कारवाई टाळण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कॅम्पाकोलातील घरे न सोडण्याच्या भूमिकेवर येथील रहिवाशी अजूनपर्यंत ठाम आहेत. त्यामुळे हा तिढा कायम असून, कॅम्पाकोलावरील कारवाईसंदर्भात पोलिस प्रशासन आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.