मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे महापौर बंगल्यातील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. दुपारी साडे तीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर गणपतीचे विसर्जन केले. विसर्जनासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब महापौर निवासात दाखल झाले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यादेखील उपस्थित होत्या.

दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणपती घेऊन महापौर बंगल्यावर दाखल झाले. महापौर स्नेहल आंबेकर या स्वतः मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. गणपती बाप्पाचा जयजयकार करत  मुख्यमंत्र्यांनी गणरायाचे विसर्जन केले. आम्ही इको फ्रेंडली मुर्ती बसवली होती, या मुर्तीचे आम्ही कृत्रिम हौदात विसर्जन केले असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरणाची हानी होणार नाही आणि विसर्जनादरम्यान कुठेही घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तर अमृता फडणवीस यांनीदेखील गणशोत्सवात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले.  देव स्वच्छतेत असतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.