मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत जंगी शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. येत्या शनिवारी २३ फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर वंचित आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या वेळी ते आघाडीची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून राज्यभर सभा-मेळावे घेऊन आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती करीत आहेत. गेल्या तीन चार महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आहे. शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा ते  प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर त्यांनी आता जिल्ह्य़ा-जिल्ह्य़ात सत्ता संपादन मेळावे घेऊन थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.