रास्त भाव दुकानांमधून आधी विकतचे धान्य उचला, मग फु कटचे तांदूळ मिळेल, ही केंद्र सरकारच्या योजनेतील अट नाही, तर राज्य सरकारने काढलेल्या आदेशातील आहे, त्याचा फे रविचार करून, राज्यातील गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहे, त्यांनी त्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

करोना साथरोगाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गरिबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून एप्रिल, मे व जून असे तीन महिने मोफत अन्नधान्य पुरविण्याची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजना जाहीर के ली. त्याच्या अंमलबजावणीचा आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ३१ मार्चला काढला. त्यात मात्र शिधापत्रिकाधारकांना त्यांचे दर महिन्याचे नियमित अन्नधान्य खरेदी के ल्यानंतर त्यांना मोफत तांदूळ दिले जाईल, अशी अट घालण्यात आली आहे. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने शुक्रवारी हे वृत्त प्रसिद्ध के ल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताची दखल घेऊन के ंद्र सरकारच्या योजनेची माहिती घेतली. त्यासंबंधीच्या के ंद्र सरकारच्या ३० मार्चच्या पत्राचा हवाला देऊन, आधी विकतचे धान्य घ्या, मग मोफतचे मिळेल, असे कु ठेही त्यात म्हटलेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोललो आहे, गरीब व गरजूंना केंद्राच्या योजनेचे मोफत अन्नधान्य मिळाले पाहिजे, त्यात काही त्रुटी  असतील त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती के ल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.