कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यानच्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहेत. यापूर्वी शुक्रवारी देखील हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. कुर्ला- टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद झाल्याने मुंबईहून पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही या मार्गावरील प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत. शुक्रवारी कल्याणजवळ मंगला एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याची घटना घडली होती. परिणामी मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडल्याचेे पाहायला मिळाले. त्यानंतर आता हार्बलची रेल्वे सेवा रखडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2017 रोजी प्रकाशित
कुर्ला-टिळकनगर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत
या मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-07-2017 at 13:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line train delay due to technical failure problem near kurla