News Flash

घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे – कन्हैया कुमार

घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे. सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. गौरी लांकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच आहेत.

घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे. सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. गौरी लांकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच आहेत असे कन्हैया कुमार मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाला.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींकडून दाभोलकरांच्या आरोपींची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना अटक करण्याआधी घाईगडबडीत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कारवाई पाच वर्षांपूर्वी का नाही झाली? असा सवाल कन्हैया कुमारने विचारला.

रावणाची दहा तोंडे होती. भाजपाचेही तसेच आहे. मोदी बोलतात एक आणि त्यांचे नेते दुसरीचभूमिका मांडतात असे कन्हैया कुमार म्हणाला. मी द्वेष निर्माण करत नाहीये. पण आता देशात द्वेष निर्माण केला जात आहे. विरोध करणाऱ्यांना घाबरवले जात आहे. सत्ताधारी लोकांच्या रक्षणाखलीच या गोष्टी सुरू आहेत असे कन्हैया कुमार म्हणाला.

लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे पण कधी लढवायची ते ठरवलेलं नाही. जेएनयू जर देश विरोधी असेल तर त्याच विद्यापीठातील विद्यार्थी असलेल्या निर्मला सीतारामन यांना संरक्षण मंत्री पदी कशी नियुक्ती केली. एका विद्यापीठाला गुन्हेगार कसे ठरवले जाते, मूळ मुद्द्यावर चर्चा टाळण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे असे कन्हैया कुमार म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2018 6:00 pm

Web Title: kanhaiya kumar is in mumbai for press confrence
टॅग : Kanhaiya Kumar
Next Stories
1 प्रेरणादायी: बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम युवकाचे अवयवदान
2 केरळमध्ये घरे उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा : प्रकाश आंबेडकर
3 श्रावणी एकादशीमुळे पंढरपुरमध्ये कुर्बानी न देताच साजरी झाली ईद
Just Now!
X