येत्या रविवारी, १९ एप्रिल रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकदरम्यान काही सेवा रद्द करण्यात येणार असून वाहतूक उशिराने धावणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे – ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर
कधी – सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
परिणाम काय? -ठाण्याच्या पुढे डाऊन मार्गावरील जलद गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे या गाडय़ा कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवरही थांबतील.  
हार्बर रेल्वे
कुठे – कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान अप मार्गावर आणि वडाळा रोड ते माहीम या स्थानकांदरम्यान अप व डाऊन या दोन्ही मार्गावर.
कधी – सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम – छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वांद्रे व अंधेरी या दरम्यानची अप व डाऊन मार्गावरील वाहतूक ब्लॉकच्या दरम्यान बंद राहील.
पश्चिम रेल्वे
कुठे – अंधेरी ते माहीम या स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर.
कधी – सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम – अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे काही सेवा रद्द करण्यात येणार  आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान वांद्रे येथील रेल्वे फाटक रहिवाशांच्या वापरासाठी बंद राहणार आहे.