मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी रविवार, ११ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.  यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावतील. तर मध्य रेल्वे मुख्य मार्गावरून मुंबईला येणाऱ्या अप मेल एक्स्प्रेस गाडय़ा निर्धारित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटे उशिरा पोहचतील.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी – स. ११.२०-दु. ३.५० वा.

परिणाम – कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावरील उपनगरी रेल्वे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर ठाणे ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावर गाडय़ा धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद मार्गाच्या गाडय़ा स. १०.१६ ते दु. ३.२२ दरम्यान निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड व दिवा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे

कधी – अप मार्ग – स.११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्ग-स. ११.४० ते दु. ४.१० वा.

परिणाम – सीएसएमटी ते वाशी, सीएसएमटी-बेलापूर व सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरील गाडय़ा बंद राहतील. त्यामुळे पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतील.  ब्लॉक काळात सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धिमा मार्ग

कधी – स. १०.३५-दु.३.३५ वा.

परिणाम – अप व डाऊन धिम्या मार्गावरील गाडय़ा सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. राम मंदिर स्थानकात  गाडय़ा थांबणार नाहीत. तसेच काही उपनगरीय गाडय़ा ब्लॉकदरम्यान रद्द करण्यात येतील.