29 October 2020

News Flash

ड्रग्स प्रकरण : दीपिकानंतर नम्रता शिरोडकरचं नाव समोर

व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधून खुलासा?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असतानाच यात ड्रग्स कनेक्शन हा नवा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणी सध्या एनसीबीद्वारे तपास सुरु असून बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची नावं समोर आली आहेत. या दीपिका पदुकोणनंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्या पत्नीचं म्हणजेच अभिनेत्री नम्रता शिरोडकरचं नाव समोर आलं आहे.

‘आजतक’च्या वृत्तानुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K हा कोडवर्ड समोर आला होता. त्यानंतर केलेल्या तपासामध्ये या नावांचा उलगडा झाला आहे. त्यानुसार D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत.

सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर जया साहा हिच्या KWAN या कंपनीची मॅनेजर करिश्माचे काही व्हॉट्स अ‍ॅप चॅट समोर आले आहेत. यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची नावं समोर आल्याचं दिसून येत आहे. यात नम्रता जयासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमध्ये “मुंबईमध्ये तू मला एमडी देशील आणि त्यानंतर आपण पार्टी करु, असं वचन तू मला दिलं होतंस. मला खरंच एका ब्रेकची गरज आहे”, असं N ने म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वी श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या दिग्गज अभिनेत्रींचीदेखील नावं समोर आली आहेत.

संसदेतही पोहोचला होता ड्रग्जचा मुद्दा

”ड्रग्ज तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्जच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.” असं भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार रवि किशन म्हणाले होते.

”चित्रपट जगतातदेखील ड्रग्जचे व्यसन जडत आहे. अनेकजणांना अटक करण्यात आलेली आहे, एनसीबी खरोखर चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, याप्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच, आपल्या शेजारील देशांचे कटकारस्थान संपुष्टात आणावे.” असेदेखील ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:36 pm

Web Title: namrata shirodkar is n in drug chats with jaya shah ssj 93
Next Stories
1 सविनय कायदेभंग : मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना अटक
2 रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीचा आज अखेरचा दिवस
3 ९५०० इमारती प्रतिबंधित
Just Now!
X