News Flash

राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत सध्या कुठलीही चर्चा नाही : नवाब मलिक

प्रकाश आंबेडकारांनाही आघाडीत सामावून घेण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांच्या राजगृह या निवासस्थानी आमची काल चर्चाही झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. या आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेण्याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी स्पष्ट केले, ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मलिक म्हणाले, काँग्रेस आणि आमच्यामध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ४४ जागांबाबत निर्णय झाला आहे आता केवळ ४ जागांबाबत निर्णय होणे बाकी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटांचाही आम्हाला पाठींबा आहे. तसेच प्रकाश आंबेडकारांनाही आघाडीत सामावून घेण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी त्यांच्या राजगृह या निवासस्थानी आमची काल चर्चाही झाली आहे.

सध्या माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची युती होणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्यातरी सुरु नाही, असे यावेळी मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 6:01 pm

Web Title: no discussion about taking raj thackeray with us says nawab malik
Next Stories
1 सध्याचा लोकायुक्त कायदा जनतेची दिशाभूल करणारा; नवाब मलिक यांचा आरोप
2 टीव्ही अभिनेता राहुल दीक्षितची आत्महत्या
3 गिरगावमधील इमारतीमध्ये भीषण आग
Just Now!
X