News Flash

अनधिकृत बांधकामांविरोधात ऑनलाइन तक्रार शक्य

अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे.

शहरातील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अनधिकृत बांधकामांची तक्रार करणे शक्य होणार असले तरी त्याआधी तक्रारदाराने ओळखपत्र दाखल करून स्वतची नोंदणी करणे आवश्यक असल्याने यासाठी किती नागरिक पुढाकार घेतील त्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
पालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर – B & F Software या लिंकवर शहरातील विनापरवाना सुरू असलेल्या बांधकामांबाबत तक्रार करणे शक्य होईल. या प्रणालीचे संकेतस्थळ www.removalofencroachment.mcgm.gov.in आहे. मात्र अनेकदा चुकीच्या तक्रारी येत असल्याने तक्रारदारांची ओळख आवश्यक असून तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल, पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही तक्रार संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल व तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, त्याची माहिती तक्रारदारास तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता आल्याने माहिती अधिकाराच्या अर्जाची संख्याही कमी होईल, असे अतिक्रमण निर्मूलनचे उपायुक्त मिलिंद सावंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 12:03 am

Web Title: online complaint possible against the unauthorized construction
Next Stories
1 गतिरोधक बसवल्याने पूर्व मुक्त महामार्गावर कोंडी
2 VIDEO : मुंबईत पोलीस ठाण्यात दाम्पत्याला बेदम मारहाण
3 ठाण्यातही करिअर मार्गदर्शन
Just Now!
X