24 January 2021

News Flash

ऑनलाइन शुल्क भरण्याच्या सुविधेचे विद्यापीठाला वावडे

विद्यापीठात विविध विषयांचे एकूण ६० विभाग असून सर्वांचीच प्रवेश प्रक्रिया रखडल्याची माहिती एका प्राध्यापकांनी दिली.

(संग्रहित छायाचित्र)

|| नमिता धुरीसर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांची रखडपट्टी

मुंबई : टाळेबंदी लागू होऊन सात महिने उलटून गेले तरी मुंबई विद्यापीठाला शिक्षणक्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराचे आव्हान पेलता आलेले नाही. लाखोंचे आर्थिक व्यवहार ऑनलाइन करणाऱ्या पिढीतील विद्याथ्र्यांना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचे साधे प्रवेश शुल्कही ऑनलाइन भरण्याचा पर्याय अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सर्वच अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया रखडली आहे.

विद्यापीठात जर्मन भाषेतील पदवी अभ्यासक्रम चालवला जातो. त्याच्या पहिल्या वर्षासाठी जुलै महिन्यात प्रवेश परीक्षा झाली. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ऑगस्ट महिन्यात मुलाखतही घेण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली असता आपला प्रवेश निश्चिात झाला असल्याचा विद्यार्थ्यांची समज झाला. मात्र, त्यानंतर त्यांना शुल्काबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नक्की प्रवेश झाला आहे की नाही, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. जवळजवळ सर्वच महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण सुरू के ले आहे. मात्र, विद्यापीठातील जर्मन विभागाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचेऑनलाइन शिक्षण सुरू झालेले नाही. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्याथ्र्यांना वाटत आहे. टाळेबंदीमध्ये जर्मनीला जाता न आलेल्या एका विद्याथ्र्याने वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठात ‘बीए इन जर्मन’ला प्रवेश घ्यायचे ठरवले. महाराष्ट्राबाहेरील काही विद्याथ्र्यांनी त्यांच्या राज्यापेक्षा मुंबईत परदेशी भाषेचे चांगले शिक्षण मिळेल या आशेने प्रवेश घेतला. मात्र, शुल्क ऑनलाइन भरण्याची व्यवस्था नाही, या क्षुल्लक कारणामुळे या सर्वांच्या पदरी निराशा येत आहे.

विद्यापीठात विविध विषयांचे एकूण ६० विभाग असून सर्वांचीच प्रवेश प्रक्रिया रखडल्याची माहिती एका प्राध्यापकांनी दिली. समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी अनेक विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे चालतात. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उशिरा होऊन निकाल लागण्यास उशीर झाल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश अजून सुरू झालेले नाहीत. दुसऱ्या वर्षाचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, त्यांचेही अधिकृत प्रवेश झालेले नाहीत.

ऑनलाइन शुल्क भरण्याची व्यवस्था करू

विद्यापीठाचे प्रभारी कु लसचिव विनोद पाटील यांच्याकडे विचारणा के ली असता, ‘पूर्वी विद्यार्थी विद्यापीठात येऊन शुल्क भरत. त्यामुळे शुल्क भरण्याची ऑनलाइन व्यवस्था नव्हती. पण टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शुल्क ऑनलाइन भरण्याची व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 1:01 am

Web Title: online fee payment lockdown field education to the university of mumbai use technology akp 94
Next Stories
1 पाच रस्त्यांसाठी २९ कोटी खर्चाचा घाट
2 सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेचा रंग फिका
3 सौर ऊर्जेमुळे कोट्यवधींची बचत
Just Now!
X